यावल (रविंद्र आढाळे) – दि 27 जानेवारी 2021 शारदा विद्या मंदिर साकळी येथे जागतिक एड्स दिन, नेहरू युवा केंद्र खेल मंत्रालय भारत सरकार व जिंदगी फाऊंडेशन, व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने HIV /AIDS जनजागृती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी कार्यक्रमाला सुश्मिता भालेराव, श्री अजय पाटील लिंक वर्कर श्री अशोक तायडे,लॅब टेकनेशियन श्री रविंद्र माळी विद्यालयाचे प्राचार्य श्री जी पी बोरसे श्री एस जे पवार,श्री जे पी पाटील (चित्रकला शिक्षक) उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी HIV /AIDS याविषयी जनजागृती करून मार्गदर्शन केले यावेळी चित्रकला स्पर्धेत
प्रथम -वेदांत चंद्रकांत नेवे
द्वितीय -उज्वला मंगल सोनार
तृतीय – कोमल सुरेश चौधरी
कांचन सुभाष माळी
यांनी क्रमांक मिळविला
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.