Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आनंदाची बातमी : मोदी सरकारची ‘ही’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

by Divya Jalgaon Team
January 27, 2021
in राष्ट्रीय
0
आनंदाची बातमी : मोदी सरकारची ‘ही’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार

नवी दिल्ली: भारत हा कृषीप्रधान देश असूनही जगातील प्रगत देशांच्या तुलनेत आपला शेतकरी गरीब आहे. चीन, जर्मनी, अमेरिका आणि कॅनडा यासारख्या देशांमध्ये शेतीमध्ये (Farming) तंत्रज्ञानाचा मोठ्याप्रमाणावर वापर होतो. त्यामुळे याठिकाणची शेती फायदेशीर ठरते. या देशांतील शेतकरी भारतापेक्षा पिकांचे खूपच जास्त उत्पादन घेतात. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता मोदी सरकारने भारतातील शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना आखली आहे. (Modi govt will double the income of farmers by atma scheme)

मोदी सरकारच्या या योजनेचे नाव ‘आत्मा’ (ATMA-Agriculture Technology Management Agency) असे आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करण्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.

त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.

आतापर्यंत ATMA योजनेतंर्गत देशातील 57,56,402 शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ट्रेनिंग, फार्म डेमोस्ट्रेशन, कृषी मेळावे अशा गोष्टींचा अंतर्भाव आहे. या योजनेचा लाभ उठवण्यासाठी शेतकरी स्थानिक कृषी केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटून माहिती मिळवू शकतात.

कृषी प्रात्यक्षिकांद्वारे नव्या तंत्रज्ञानाची ओळख करुन देणार

कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोणत्याही नव्या बियाणासंदर्भातील प्रात्यक्षिक या योजनेद्वारे दिले जाईल. कृषी विभागापूर्वी कोणतेही बियाणे कृषी विज्ञान केंद्राला (KVK) मिळते. केवीके कडून हे बियाणे आपल्या आवारात आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतात लावले जाते. बियाणे, खत आणि औषध अशी सामुग्री केवीके कडून पुरवली जाते. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राकडून संबंधित बियाण्यामुळे येणाऱ्या पिकाच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. ज्याठिकाणी अशा पिकांची लागवड केली जाते तिथे दुसऱ्या शेतकऱ्यांनाही बोलावले जाते. यासाठी शेतकऱ्यांना ब्लॉक स्तरावर ट्रेनिंग दिली जाते.

कृषी संशोधक आणि शेतकऱ्यामध्ये ताळमेळ साधण्याचा प्रयत्न

अनेकदा कृषी प्रयोगशाळेत यशस्वी ठरलेले मॉडेल प्रत्यक्ष शेतात मात्र फेल ठरते. त्यामुळे ATMA योजनेतंर्गत कृषी संशोधक आणि शेतकऱ्यांमधील समन्वय वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतीमधील उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिले जाते. शास्त्रीय पद्धतीने शेती केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवता येऊ शकते.

बियाणे न बदलल्यामुळे उत्पादनात घट

कृषी संशोधकांच्या मते भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नव्या आणि शास्त्रीय पद्धतीने शेती करण्याची गरज आहे. चीन, जर्मनी आणि अमेरिका यासारख्या देशातील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ शकते. मात्र, शेतकरी पारंपारिक पद्धती बदलण्यास घाबरतात. त्यामुळेच आपल्याकडे प्रगत देशाच्या तुलनेत 20 टक्के कमी उत्पादन येते, असे कृषी संशोधक साकेत कुशवाहा यांनी सांगितले.

Share post
Tags: #DelhiFarmerMarathi NewsModi SarkarNew Delhiआनंदाची बातमी : मोदी सरकारची 'ही' योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार
Previous Post

यावल पंचायत समितीत वरिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

साकळी येथे जागतिक एड्स दिनानिमिताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Next Post
साकळी येथे जागतिक एड्स दिनानिमिताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

साकळी येथे जागतिक एड्स दिनानिमिताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group