मुंबई – एकनाथराव खडसे यांना कट कारस्थान करून बाजूला सारण्यात आले असले तरी त्यांनी दाखवून दिले की ‘टायगर अभी जिंदा है’ अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी स्तुतीसुमने उधळली.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपचा त्याग करून राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी चौफेर टोलेबाजी केली. याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, आपण स्वतः एकनाथराव खडसे यांच्यासह १९९० साली विधानसभेत प्रवेश केला.
याप्रसंगी त्यांनी एक विधानसभा सदस्य किती चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे दाखवून दिले. त्यानंतर त्यांचे सरकार आल्यानंतर अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द राहिली. तर प्रदीर्घ काळ विरोधात राहून त्यांनी एक सक्षम विरोधी नेता कसा असतो हे दाखवून दिले. आणि सरकार आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करून त्यांना बाजूला सारण्यात आले.
या प्रसंगी आपण एकनाथराव खडसे यांच्या बाजूने खूप बोललो. एकदा आपण विधानसभेत प्रश्न विचारला होता की, “कटप्पा ने बाहुबली बबली को क्यू मारा ? ” या प्रश्नाचे उत्तर आजही मिळालेले नाही. अर्थात उत्तर मिळाले नसले तरी एकनाथराव खडसे यांनी दाखवून दिले की, ‘टायगर अभी जिंदा है आणि हो पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत त्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कार्याचा गौरव केला.
अजून वाचा
Breaking : अखेर माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश