जळगाव- एकनाथराव खडसे यांचे मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची फक्त चर्चा होत होती.
मात्र आज शुक्रवारी (दि.२३) रोजी दुपारी ३ वा. अखेर मुंबई येथे खडसे यांनी राष्ट्रवादीत कन्या रोहिणी खडसे सह अनेक कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसमोर खडसे समर्थक व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आतिषबाजी करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सुरज नारखेडे जिल्हा सरचिटणीस विद्यार्थी काँग्रेस व रोहन सोनवणे जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी ,अक्षय वंजारी ,सौरभ पाटील, सौरभ वाणी आणि असंख्य कार्यकर्ते आदी उपस्थित होते.