Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल जळगावच्या “शावैम”चा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

by Divya Jalgaon Team
January 26, 2021
in जळगाव, प्रशासन
0
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल जळगावच्या "शावैम"चा पालकमंत्र्यांनी केला सन्मान

जळगाव : गरीब व गरजू रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळावेत याकरिता महात्मा ज्योतिबा  फुले जन आरोग्य योजना सुरु झालेली आहे. या योजनेतून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनातर्फे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन मंगळवारी २६ जानेवारी रोजी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोना विरहित रुग्णालय सुरु झाल्यावर जळगावच्या शासकीय रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना सुरु झाली आहे. या योजनेसाठीचे कार्यालय रुग्णालयाच्या आवारात दर्शनी भागात असून येथे २ डाटा एंट्री ऑपरेटर सह नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.  यामध्ये  किडनी विकार, अपघाताचे रुग्ण, गर्भवती महिला, क्षयरोग, जनरल सर्जरी, हर्निया, हृदयरोग, विषबाधा, लहान मुलांचे आजार, डायलिसिस आदी आजाराने ग्रस्त रुग्णांना देखील लाभ झाला आहे. या कार्याचा गौरव करून राज्य सरकारने राज्यातील सहा शासकीय रुग्णालयांचा सन्मान केला. यात जळगाव, अकोला, कोल्हापूर, लातूर, धुळे, मुंबई या शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.

मंगलम हॉल येथे मंगळवारी २६ जानेवारी रोजी एका कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे उपस्थित होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा सन्मान अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, रुग्णालयातील योजनेचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांच्यासह नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव, कर्मचारी माधुरी पाटील, अभिषेक पाटील, आरती दुसाने यांनी स्वीकारला.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक), अन्नपूर्णा, अंत्योदय कार्ड कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य  योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ही योजना जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु झाली आहे. यासाठी ओरिजनल आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीय बँकेचे पासबुक, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट या कागदपत्रांची आवश्यकता असते.  ज्या रुग्णांना विविध आजारांवर उपचार घ्यायचे आहेत, मात्र आर्थिक अडचण आहे, त्यांनी रुग्णालयातील योजनेच्या कार्यालयात संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी नोडल अधिकारी डॉ. आलोक यादव यांना संपर्क करावा असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

“राज्य शासनाने केलेल्या सन्मानामुळे योजनेत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या रुग्णालयातील सर्व घटकांना प्रोत्साहन मिळणार आहे. ज्या रुग्णांना उपचार करण्यासाठी आर्थिक अडचण आहे, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून रुग्णालयातील उत्तम आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा” – डॉ. जयप्रकाश रामानंद, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत उत्कृष्ट कार्याबद्दल जळगावच्या "शावैम"चा पालकमंत्र्यांनी केला सन्मान
Previous Post

“शावैम” मध्ये ध्वजारोहण ; कोरोना योध्यांचाही सन्मान

Next Post

तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू

Next Post
तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू

तालुक्यातील शिंदी येथील जवानाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group