नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उदघाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री नागपुरात दाखल होणार असून चार वाजता हे उदघाटन होणार आहे. 1 हजार 914 हेक्टरवर पसरलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानं विदर्भातील नवं पर्यटन स्थळ होणार आहे. उद्घाटनानंतर भारतीय सफारी नागरिकांसाठी सुरु होणार आहे.
40 आसन क्षमतेच्या एसी बसमधून नागरिकांना सफारीचा आनंद लुटता येणार आहे. यामध्ये भारतीय सफारीसाठी वाघ, अस्वल, बिबट आणि तृणभक्षी प्राणी सोडण्यात आलेत पुढच्या टप्प्यात आफ्रिकन सफारी, बर्ड सफारी, नाईट सफारीचे नियोजन करण्यात आले आहे.
तसंच,इंडियन सफारीचे दर पण तुलनेत कमी असून सोमवार ते गुरुवार बेंझ एसी बसचे दर 300 रुपये आणि 400 रुपये आयशर एसी बससाठी आहेत. सध्या दोन्ही बस दरांमध्ये 20 टक्के सुट देण्यात आली आहे.