नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिलेल्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकरी आज राजधानीत घुसणार असून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.
दिल्ली-हरियाणाच्या तिकरी बॉर्डरवर शेतकऱ्यांची पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेड्स तोडले आहेत. हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही.
दरम्यान तिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.
तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.
#WATCH Protesting farmers break police barricading at Delhi-Haryana Tikri border
Farmers are holding tractor rally today in protest against Centre’s three Farm Laws#RepublicDay pic.twitter.com/3tI7uKSSRM
— ANI (@ANI) January 26, 2021