Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

by Divya Jalgaon Team
January 26, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जळगाव प्रतिनिधी । म्हसावद येथील तरूणाची एचडीएफसी बँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली ९३ हजाराची फसवणूक करणारा जळगाव सायबर क्राईम पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

म्हसावद येथील राहणारा सचिन संजय मराठे या बेरोजगार युवकाने नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन जॉब वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्याला १२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रवीसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग व श्रेया असे नाव सांगणार्‍या व्यक्तींनी मोबाइलवर कॉल करुन संपर्क साधला. त्याला एचडीएफसी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी ९३ हजार रुपये त्याच्याकडून घेतले. तसेच बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली.

बँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत

या प्रकरणी मराठे याच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांनी तपास केला असता हा प्रकार अनिलकुमार सुरेश कुमार उर्फ विक्रम यादव व राहुल मदनलाल चौरसिया (रा. आझादनगर, चंदोली, उत्तर प्रदेश) यांनी केल्याचे दिसून आले. संशयितांचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक दिल्लीला रवाना झाले होते. या पथकाने दोन दिवस दिल्ली येथे संशयिताचा शोध घेतला. अखेर विक्रम यादव या दिल्लीतील रणहोला या भागातून पथकाने त्याला ताब्यात घेतले. यादव याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जळगाव सायबर पोलीस पथकाचे पोेलिस उपनिरीक्षक अंगद नेमाने व दिलीप चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई दीपक सोनवणे, बाळकृष्ण पाटील, प्रवीण वाघ, श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली.

दिलासा : खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांनी घसरण; जाणून घ्या दर

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी – पंकजा मुंडे

Share post
Tags: AcusedcrimeFraudJalgaonMarathi NewsPolice Custodyबँकेत नोकरी लाऊन देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अटकेत
Previous Post

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना व्हावी – पंकजा मुंडे

Next Post

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले

Next Post
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group