जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगरात एका २२ वर्षीय तरूणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या शरीरावर जखमा असल्याने त्याचा घातपात झाल्याचा शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जळगावातील शाहू नगरात संशयास्पद मृतदेह आढळला
शहरातील शाहू नगर परिसरात असणाऱ्या जळकी मिलजवळ रात्री आठच्या सुमारास एका तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने त्याचा घातपाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत तरूणाची ओळख पटली असून त्याचे नाव अल्तमश शेख शकील (वय २२) असल्याची माहिती मिळाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.