जळगाव – शासनातर्फे जनतेला रक्तदानासाठी आवाहन केले जात असल्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तसाधून पाणंद फाऊंडेशन व नुतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचं आयोजन दि.२४ जानेवारी रविवारी सकाळी १० ते २ या वेळेत करण्यात आले. या शिबिरात एकूण १०६ माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान केल्याने शासनाच्या आवाहन प्रतिसाद दिला.तसेच गरजवंतांना यामुळे रक्तसाठा उपलब्ध होणार असल्याने रक्तदानासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शिबिराला भेट दिली.
पाणंद फाऊंडेशन ही नुतन मराठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची संस्था आहे. सामाजिक जाणिवेतून विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन पाणंद फाऊंडेशनतर्फे वेळोवेळी करण्यात येते. या रक्तदान शिबीराचं उद्घाटन महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद व नुतन मराठा विद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख, उपायुक्त प्रशांत पाटील, मंत्रालयातील अधिकारी मनीष पाटील,आर.पी.एफ.पोलीस निरीक्षक सी.एस.पटेल हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थापक दिलीप बारी, प्रा.सतीश पडलावार, पाणंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अमित तडवी, शशिकांत फेगडे, ज्ञानेश्वर साळुंखे,अमित मगन पाटील, संतोष उबाळे, गजानन शिंदे, पद्माकर खैरनार, हर्षल पाटील, पंकज नहाले, व पाणंद फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे.