मुंबई : मुंबईमधील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये गुरुवारी रात्री उशिरापासून ही भीषण आग लागली. या घटनेचे माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २४ गाड्या ,१६ ट्रँकर तसेच अग्निशामक दलातील अधिकाऱ्यांसह २५० जवान कार्यरत आहेत. जवळपास १२ तासांपासून या आगीचे तांडव सुरु आहे. एका मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि ती मॉलमध्ये पसरल्याची माहिती मिळाली आहे.मुंबईत मध्यरात्रीपासून सिटी सेंट्रल मॉलला भीषण आग.
रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या १२ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रमेश चौगुले किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऑर्किड टॉवर या जवळच्या इमारतीमधून साधारण ३५०० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. गुरुवारी रात्री ९ वाजल्यापासून मुंबई सेंट्रल, भायखळा, क्लॉसिक रोड, नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलमध्ये ही आग भडकली आहे. १२ तास उलटूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळू शकलं नाही.
रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे. संपूर्ण मॉल आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. त्यामुळे अग्निशमन दलाकडून ब्रिगेड कॉल आला असून गेल्या १२ तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
अजून वाचा
नंदुरबारमधील अपघातात जळगावातील १५ व्यक्तींचा समावेश