जळगाव प्रतिनिधी । वाईट कृत्य करण्यासाठी घराची चावी मागणार्या वॉर्डबॉयला सिव्हीलच्या आवारात एका आशा वर्करने चोपल्याची घटना घडली असून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ममुराबाद येथील एका आशावर्करने गुरुवारी सिव्हिलच्या प्रवेशद्वाराजवळ वॉर्डबॉय किरण दुसाने यांची धुलाई केली. या वेळी गेटवर ड्यूटीवर असलेल्या पोलिस व सुरक्षा रक्षकांनी किरण दुसाने यांची महिलांच्या तावडीतून सुटका केली. अधिष्ठाता यांना दिलेल्या तक्रारीत पवार यांनी म्हटले की,
किरण दुसाने व बापू नारायण बागलाने हे दोघे एक महिन्यापासून सोबत अनोळखी महिलांना घेऊन दुपारी जेवणानंतर तुमच्या घरी येऊ असे सांगतात. तुमच्या घराची चावी द्या, या मागणीसाठी दीड महिन्यात ८ ते १० वेळा फोन केले. त्यावर नकार दिला असता हे दोन्ही कर्मचारी शिवीगाळ करत असल्याचा आरोप या तक्रार अर्जात केला आहे.
तसेच किरण दुसाने व बापू बागलाने यांनी मात्र या प्रकरणात आपल्याला विनाकारण अडकविण्यात येत असल्याचा दावा केला आहे. दुसाने यांनी या प्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून स्वच्छता निरिक्षक बागलाने यांनी संबंधीत आशा वर्करची चौकशी करण्याची मागणी केली आहे.