मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ३ वाजता वेळेत बदल. प्रवेश आज दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होणार होता मात्र सह्याद्री’वर चाललेल्या बैठकीमुळे आज दुपारी ३ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होणार आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे. एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशच्या वेळेत बदल.
ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. याआधी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. एकनाथराव खडसे म्हणाले कि, कोणत्याही पदासाठी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही. मी मंजुरी दिलेली उत्तर महाराष्ट्रातील अनेक विकासकामे प्रलंबित आहेत.
या विकासकामांना वेग मिळावी यासाठी सरकारची साथ हवी आहे. म्हणून मी सरकारमध्ये असले पाहिजे, असे त्यांनी सांगितले आहे. तर शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यामागे शरद पवारांची राजकीय गणितं असू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
मात्र, नियोजन मंडळाचं पद देऊन एकनाथ खडसेंना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होऊ शकतो, असं मत वर्तविले जात आहे. . ‘एकनाथ खडसे यांचे शिवसेनेसोबत चांगले संबंध नाहीत, त्यामुळे खडसेंसाठी ग्रामीण भागाशी कनेक्ट असलेले कृषी खातं का सोडायचं? असा प्रश्न शिवसेनेत निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला एकनाथ खडसे यांना मंत्रिपद देणं शक्य नसलं तर नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्ष पद एकनाथ खडसेंना दिलं जाऊ शकतं, या पदाला कॅबिनेट दर्जा आहे. ‘
अजून वाचा
एकनाथराव खडसे आज दुपारी होणार रवाना