यावल –( रविद्र आढाळे)तालुक्यातील नायगाव येथील अजय सुधाकर देशमुख ५२ वर्षीय व्यक्तीने नैराश्यातुन शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
नायगाव ता. यावल येथील रहिवासी अजय सुधाकर देशमुख वय ५२ यांचा गेल्या काही महिन्यापुर्वी अपघात झाला होता. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा पाय कापून टाकावा लागला होता. पाय नसल्याने ते गेल्या काही महिन्यांपासून निराश आणी अत्यंत दुखी होते. याचं नैराश्यातून त्यांनी शुक्रवारी ५ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सदर प्रकरण निदर्शनास आल्यावर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्यात आले.याप्रकरणी पोलिसात अक्षय देशमुख यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार सुनिल तायडे हे करीत आहे .