यावल ( रविंद्र आढाळे) – येथील तालुका शिवसेनेच्यावतीने हिन्दु हृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
यावल तालुका शिवसेनाच्या वतीने येथील जे .टी . महाजन व्यापारी संकुलनातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात आज शिवसेनाप्रमुख हिन्दू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात पार पडली या निमित्ताने उपस्थित शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे , माजी नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी , तालुका उप प्रमुख शरद कोळी , सेनेचे यावल शहर उपप्रमुख संतोषखर्चे ,आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख हुसैन तडवी , आर . के. चौधरी सर , सागर बोरसे , योगेश चौधरी , मोहसीन खान , अजहर खाटीक ,पप्पु जोशी , शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कडु पाटील , किरण बारी , भरत चौधरी , शकील पटेल , चेतन पाटील , चंद्रकांत चौधरी,रिषी दिपक बेहेडे , प्रकाश धोबी , सागर देवांग , ज्ञानेश्वर चौधरी , अनिल पाटील आदी तालुक्यातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभीवादन करून आदरांजली वाहीली.