जळगाव – 32 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान निमित जिजाऊ ड्राइविंग स्कुलच्या वतीने व उपप्रादेशिक परिवहन जळगाव ,महामार्ग पोलीस केंद्र पाळधी यांच्या संयुक्तिक रित्या रक्तदान शिबिर दि.२२ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वा. महाबळ येथे आयोजीत करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख श्याम लोही यांची उपस्तीथी होती.त्यांनी वाहतुक नियम व रक्दानाचे महत्व सांगितले. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र पाळधीचे प्रभारी अधिकारी सपोनि सुनील मेढे व शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी देविदास कुनगर पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन पर प्रबोधन केले व वाहतूक नियमांची माहिती दिली.
राष्ट्रीय महामार्ग रिक्षा, मॅटाटोर या चालकांना रस्ता सुरक्षा अभियान बाबतीत सविस्तर माहिती दिली तसेच सीटबेल्ट, हेल्मेट, नशापान यांच्याकडून होणारे फायदे व तोटे समजावून सांगितले.तसेच यावेळी अपघात टाळण्यासाठी काय करता येईल याची ही माहिती देण्यात आली.या प्रसंगी रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, म.पो. केंद्र पाळधीचे १२ पोलीस अमलदार यांची उपस्तीथी होती.