यावल ( रविंद्र आढाळे) – येथील तहसील कार्यालयात प्रशासकीय पातळीवर आयोजीत कार्यक्रमात देशाच्या थोर समाजसेवक व स्वातंत्र चळवळीतील महापुरुष यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावल येथील तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात आज देशाच्या स्वातंत्र चळवळीचे स्वातंत्रसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि थोर समाजसेवक हिन्दु ह्वदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार . नायब तहसीलदार आर .डी . पाटील , सुयोग पाटील , दिपक बावीस्कर कार्यालयीन कर्मचारी व आदींच्या उपस्थितीत नेजाजी सुभाषचंद्र बॉस आणी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात येवुन आदरांजली वाहण्यात आली .