Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वरणगाव पाणी पुरवठा योजनेचा कार्यादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

लागलीच सुरू होणार काम; नागरिकांची भागणार तहान

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in प्रशासन, राजकीय
0
वरणगाव पाणी पुरवठा योजनेचा कार्यादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

gulabrao patil

जळगाव – भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रूपयांच्या रखडलेल्या पाणी पुरवठा योजनाला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने अलीकडेच मंजुरी मिळाली होती. यानंतर संबंधीत योजनेचा कार्यादेश अर्थात वर्क ऑर्डर आज वरणगावच्या मुख्याधिकार्‍यांना प्रदान करण्यात आली आहे. परिणामी ही योजना लागलीच सुरू होणार असून वरणगावकरांची तहान लवकरच भागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील २५ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला दिलेली स्थगिती राज्यसरकारने ६ जानेवारी रोजी उठवली होती. यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेले प्रयत्न निर्णायक ठरले होते.

आधीच्या युती सरकारच्या काळात ही २५ कोटी रुपयांची योजना मंजूर करण्यात आली परंतु सरकार बदलानंतर सर्वच योजनाना स्थगिती देण्यात आली होती. या पाणीपुरवठा अत्यावश्यक सेवा असल्याने या योजनेला मान्यता मिळावी यासाठी नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न करून पाठपुरावा केला होता याचे फलित म्हणून आज या योजनेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे.

दरम्यान, ६ जानेवारी रोजीच सुधारित सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्यास कार्यादेश देण्याचे व निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास ती पूर्ण करून कार्यादेश देण्याची कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश नगर विकास विभागाचे सहसचिव पां.जो. जाधव यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते.

या अनुषंगाने आज वरणगावच्या पाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते
वरणगावचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी पाणी पुरवठा अभियंता गणेश चाटे, कंत्राटदार अमित जैन व सचिन जैन यांची उपस्थिती होती. या योजनेचे काम लागलीच सुरू करण्यात येणार असल्याने वरणगावकरांच्या कधीपासूनच्या प्रलंबीत समस्येचे निराकरण होणार आहे.

या पाणीपुरवठा योजनेला मिळालेली स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

Share post
Tags: नागरिकांची भागणार तहानपाणी पुरवठा योजनेची वर्कऑर्डरपालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 'कर्मव्यवस्था' पुस्तकाचे प्रकाशन
Previous Post

नायगाव येथील एका ५२ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

राज्यात पहिल्या टप्प्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु

Next Post
राज्यात पहिल्या टप्प्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु

राज्यात पहिल्या टप्प्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group