नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) मोठा प्रमाणत वापर होत आहे. या ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात आधीपासून अनेक कंपन्या पेटीएम (Paytm), फोनपे (Phonepe), गूगल पे (Google Pay), अमेझॉन पे (Amazon Pay) आधीपासूनच आहेत. आता बजाज फायनान्सनेही (Bajaj Finance) या आर्थिक वर्षाच्या अखेरीस, अर्थात मार्च 2021 पर्यंत डिजिटल पेमेंट अॅप बजाज पे (Bajaj Pay) लाँच करण्याची घोषणा केली आहे.
बजाज फायनान्सने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी युजर्ससाठी डिजिटल पेमेंट अॅप बजाज पे तिसऱ्या तिमाहीमध्ये लाँच करणार आहे. हे अॅप युजर्सला यूपीआय, पीपीआय, ईएमआय कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधीत पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. त्याशिवाय कंपनी आपल्या मर्चेंट्ससाठीही बजाज पे अॅप डेव्हलप करणार आहे.
बजाज पे अॅपव्यतिरिक्त कंपनी आपल्या ग्रुप ऑफ कंपनीजसाठी 5 प्रोपरायटी मार्केटप्लेस (Proprietary marketplaces) तयार करत आहे. यात ईएमआय स्टोअर (EMI Store), इन्शोरन्स मार्केटप्लेस (Insurance Marketplace), इन्व्हेस्टमेंट मार्केटप्लेस (Investment Marketplace), बीएफ हेल्थ (BF Health) आणि ब्रोकिंग अॅप (Broking App) सामिल आहे. त्याशिवाय कंपनी 25 दुसऱ्या अॅप इकोसिस्टम्सशी पार्टरनशिप करणार आहे, जेणेकरून आपल्या ग्राहकांना आवश्यकतेनुसार, सर्व सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्स उपलब्ध होऊ शकतील.
बजाज फायनान्सने दिलेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील तिमाहीमध्ये आपला व्यवसाय ट्रान्सफॉर्म करण्यासाठी 4 प्रोडक्टिविटी अॅप्स डेव्हलप करणार आहे, ज्यांची नावं सेल्स वन अॅप (Sales One app), मर्चेंट अॅप (Merchant app) कलेक्शन्स अॅप (Collections app) आणि पार्टनर अॅप (Partner app) अशी आहेत. या ऍपमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, असंही बजाजने सांगितलं आहे.