Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट

आरोपीला अटकेत

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in राष्ट्रीय
0
धक्कादायक : शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर मागच्या दोन महिन्यांपासून नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात सध्या सरकार आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेची बारावी फेरी पार पडल्यानंतरही कोंडी कायम आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेता प्रजासत्ताक दिनी दिल्ली ट्रॅक्टर रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे. शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर आणले. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता.

ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता, अशी कबूली पकडण्यात आलेल्या आरोपीनं दिली आहे. शेतकरी नेत्यांनी आरोपीला आंदोलनस्थळी पकडलं. त्यानंतर माध्यमांसमोर त्याला आणण्यात आलं. त्याचा चेहरा झाकलेला होता. ‘२६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल होता.

शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केले जाणार होते. यासाठी आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्या व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं, तो स्वतः पोलीस आहे,’ अशी खळबळजनक कबुली आरोपीनं दिली आहे.

#WATCH | Delhi: Farmers at Singhu border present a person who alleges a plot to shoot four farmer leaders and cause disruption; says there were plans to cause disruption during farmers’ tractor march on Jan 26. pic.twitter.com/FJzikKw2Va

— ANI (@ANI) January 22, 2021

Share post
Tags: #FiringAcusedAndolanAttackFarmerNew DelhiPolice Custodyधक्कादायक : शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट
Previous Post

मोठी बातमी : जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत

Next Post

युजर्सला मिळणार आणखी एक डिजिटल पेमेंट ऍप, Bajaj Finance लाँच करणार

Next Post
अर्थसंकल्पाच्या सर्व अपडेट्ससाठी डाऊनलोड करा नवे ऍप

युजर्सला मिळणार आणखी एक डिजिटल पेमेंट ऍप, Bajaj Finance लाँच करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group