Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मायबापाची जबाबदारी टाळली तर थेट 30 टक्के पगार कपात

औरंगाबाद जिल्हा परिषदचा निर्णय!

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in राज्य
0
मायबापाची जबाबदारी टाळली तर थेट 30 टक्के पगार कपात

औरंगाबाद : आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पगारात 30 टक्के कपात (Aurangabad ZP Will Cut 30 Percent Salary) करण्याचा ठराव औरंगाबाद जिल्हा परिषदेने पारित केला आहे. औरंगाबादच्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे काही अधिकारी आणि कर्मचारी आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत. त्यांना सन्मानाची वागणूक देत नाही, अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी सर्वसाधारण सभेत आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. जिल्हा परिषदेच्या या निर्णयाने वृद्ध पालकांना दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांमध्ये हजारो कर्मचारी आणि अधिकारी काम करतात. यातील अनेक जण आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या चौकशीअंती पगारातून 30 टक्के पगार कपात करुन आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा ठराव सभागृहात सर्वानुमते पारित झाला.

औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे काही कर्मचारी आणि अधिकारी आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करत नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. काही तक्रारी अत्यंत गंभीर स्वरुपाच्या असल्याचं समोर आलं होतं. त्यावर चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा 30 टक्के पगार कपात करण्याचा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने सर्व सदस्यांनी मंजूर केला.

Share post
Tags: AurangabadMarathi NewsZP Newsमायबापाची जबाबदारी टाळली तर थेट 30 टक्के पगार कपात
Previous Post

युजर्सला मिळणार आणखी एक डिजिटल पेमेंट ऍप, Bajaj Finance लाँच करणार

Next Post

जिल्ह्यात आज २२ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज २२ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group