पुणे | कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. ऑनलाईन वर्ग सुरु होते मात्र आता लवकरच शाळा उघडणार आहेत. पुण्यात येत्या १ फेब्रुवारीपासून शाळा भरणार आहेत.
पुणे शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता २७ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारीपासून शाळा सुरु होणार आहे.
शाळा सुरु होणार असल्या तरी कोरोनाविषयक नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणं या गोष्टी विद्यार्थ्यांना पाळाव्या लागणार आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांचे संमतीपत्रक घेण्यात येणार आहे. तसेच शाळा सुरु होण्यापूर्वी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना योग्य त्या सूचना देखील करण्यात येणार आहेत.