Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

सोन्याचे दर घसरले; वाचा काय आहेत आजचे भाव

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in राज्य
0
मोठी बातमी! १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाही

मुंबई : अमेरिकेत सुरू असलेल्या घडामोडींमुळे आणि कोरोना लसीच्या बातम्यांमुशे सराफा बाजारात सोन्यामध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जागतिक बाजारात सेन्सेक्सनं उसळी मारल्यानंतर सोन्याचे भाव वधारले होते. पण आता आठवड्याच्या शेवटी पुन्हा सोनं घसरलं आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 48,510 वर पोहोचला. चांदीबद्दल बोलायचं झाल्यास आज 10 ग्रॅम चांदीची किंमत 668 वर पोहोचली आहे.

महत्त्वाच्या शहरांमधील सोन्याचे भाव

सोन्याचा भाव आज काल

नागपूर 48450 48550

पुणे 49,540 49,550

नाशिक 49,540 49,550

नवी दिल्ली 48240 48250

हैद्राबाद 46090 46100

दागिने बनवण्याची उत्तम संधी

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. कारण, सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. शुक्रवारी प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 50 हजार रुपयांवर पोहोचली होती पण आज किंमत आणखी घसरली आहे. म्हणून सोनं खरेदीसाठी ही उत्तम संधी आहे.

सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाल्यामुळे खरेदीदार खूश आहेत. अशात सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोन्या-चांदीची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत, या महिन्यात लोक दागिन्यांसाठी अधिक मागणी करत आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाच्या संकटामुळे कोणीही दागिन्यांकडे फार भर दिला नाही. पण आता लसीकरण सुरू झाल्यामुळे त्यात मकर संक्रांतीनंतर सोन्याची मागणी पुन्हा वाढली आहे.

सोन्याची मागणी आणखी वाढेल

पुढच्या 3-4 महिने सोन्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल ते मे या कालावधीत लग्नाचा शुभ काळ असतो. त्यामुळे जूनपर्यंत सोनं खरेदी अशी सुरू राहिल. सध्या सोन्या-चांदीची किंमत कमी होत असल्याने लोक अगोदरच दागिन्यांची ऑर्डर देत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमध्ये अनेक विवाह थांबले होते. यावेळी लस येण्याची शक्यताही कमी होती. त्यामुळे लोकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली. पण आता पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं आहे.

Share post
Tags: #Gold-Silver RateMarathi NewsMumbaiसोन्याचे दर घसरले; वाचा काय आहेत आजचे भाव
Previous Post

तारिख बदलली शाळा सुरु होण्याची; आता ‘या’ तारखेला भरणार वर्ग!

Next Post

भाजप नगरसेवकाची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Next Post
भाजप नगरसेवकाची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

भाजप नगरसेवकाची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group