थायलंड : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि समीर वर्मा यांचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधूला थायलंडच्या चौथ्या सीडेड रॅटचनॉक इंटानोनने १३-२१, ९-२१ असे पराभूत केले. सिंधूला या सामन्यात इंटानोनला फारशी झुंज देता आली नाही. पहिल्या गेमच्या मध्यंतराला इंटानोनकडे ११-७ अशी आघाडी होती. यानंतर सिंधूने या गेममध्ये १३-१३ अशी बरोबरी केली. परंतु, इंटानोनने दमदार पुनरागमन करत हा गेम २१-१३ असा जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने निराशाजनक खेळ केला. त्यामुळे इंटानोनने हा गेम २१-९ असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.
मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि अश्विनी पोनप्पाने मलेशियाच्या चॅन पेंग सून आणि गोह लियू यिंगवर १८-२१, २४-२२, २२-२० अशी मात केली. या सामन्यातील अखेरचे दोन गेम चुरशीचे झाले. मात्र, सात्विक आणि अश्विनीने योग्य वेळी त्यांचा खेळ उंचावत हा सामना जिंकला. त्यामुळे सात्विक आणि अश्विनी या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
🇮🇳’s @sameerv2210 shows great character and fighting spirit before going down to A. Antonsen of 🇩🇰 in the quarterfinals #ToyotaThailandOpen2021 .
Final score: 13-21, 21-19, 20-22
Great fight, champ! 🔥#ToyotaThailandOpen2021 #ToyotaThailandOpen #ThailandOpenSuper1000 pic.twitter.com/OHFmY4hmk7
— BAI Media (@BAI_Media) January 22, 2021