मेष : काहीशी चिडचिड वाढेल. लहान मुलांमध्ये रमून जाल. नवीन मित्र जोडले जातील. सरकारी कामात वेळ जाईल. कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे.
वृषभ : मनातील इच्छा पूर्ण होईल. मानसिक चांचल्य जाणवेल. घरापासून दूर जावे लागेल. मनातील गैरसमज काढून टाकावेत. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
मिथुन : अपचनाचा त्रास जाणवेल. कामात चालढकल करू नका. हितशत्रूंवर लक्ष ठेवावे. शारीरिक उष्णता वाढेल. जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे.
कर्क : कामाची धांदल उडेल. प्रलोभनाला बळी पडू शकता. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. मुलांची चिंता लागून राहील. पैज जिंकण्याची इच्छा बाळगाल.
सिंह : वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. घरातील समस्यांकडे अधिक लक्ष द्या. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष असू द्या. नव्या संधीची वाट पहावी. जुने आजार दुर्लक्षित करू नका.
कन्या : वैवाहिक सौख्य द्विगुणित होईल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. भावंडांशी मतभेद संभवतात. स्वमतावर आग्रही राहाल. संघर्षाला बळी पडू नये.
तूळ : आर्थिक बाजूचा नीट विचार करावा. जरूरी नसताना उदार होऊ नका. स्वभावात लहरीपणा राहील. वादविवाद घालू नका. डोळ्याचे त्रास जाणवू शकतात.
वृश्चिक : कामात हटवादीपणा येईल. महत्त्वाकांक्षा वाढेल. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांचाही विचार करावा.
धनू : जबाबदारीने वागाल. मनात कसलीशी काळजी लागून राहील. प्रवासात काळजी घ्यावी. घरातील काही गोष्टी बदलाव्या लागतील. कौटुंबिक प्रश्न सोडवावेत.
मकर : खर्चाचे गणित जमवावे लागेल. कामात क्षुल्लक अडचणी येऊ शकतात. वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. जुन्या गोष्टी काढत बसू नका. कामाचा ताण राहील.
कुंभ : बदललेल्या गोष्टी नीट समजून घ्याव्यात. कामात चंचलता राहील. मित्रांचा रोष वाढू शकतो. झोपेची तक्रार जाणवेल. कौटुंबिक समाधान असेल.
मीन : दिवस मनासारखा घालवाल. दोन पाऊले मागे येण्यास घाबरू नका. स्थावरच्या कामातून लाभ संभवतो. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. कामात प्रगती कराल.