जळगाव – राज्यातील बारा कोटी बंधू-भगिनी करीता राज्यव्यापी अभियान अंधारातून प्रकाशाकडे मोठ्या शहरापासून ते छोट्या वस्तीपर्यंत दि.२२ ते ३१ जानेवारी पर्यंत राबविला जाणार असल्याची माहिती सोहेल अमीर शेख यांनी पत्रकार परिषदेत देण्यात दिली.तसेच यावेळी मोहंमद समी, वकार अजीम,शेख मुस्ताक रिजवान खाटीक यांची उपस्तीथी होती.
या राज्यव्यापी अभियानात समाजातील अज्ञानता,घृणा व भौतिकवादाचा अंधकारातून वाचविण्याच्या उद्देशाने जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र् २०२१ ची सुरुवात करण्यात आली. या अभियानात प्रेषितांचे मौलिक संदेश लोकांपर्यंत पोहचविला जाणार असून इंग्रजी,हिंदी व मराठी भाषेतील कुराणाच्या प्रति लोकांमध्ये मोफत वितरित केला जाणार आहे. तसेच इस्लाम संबंधित ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न असतील त्यांचे उत्तर ही देण्याचा प्रयत्न जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे केला जाणार आहे.