जळगाव – निधी फाऊंडेशनतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचे आयोजन करण्यात आले असून मकरसंक्रांतीनिमित्त घरोघरी हळदी-कुंकवाचे महिला एकमेकींना वाण देत असतात. महिला आणि मासिक पाळीचा एक जवळचा संबंध असला तरी मासिक पाळी विषयी अद्यापही मानसिकता बदललेली नाही. त्यामुळे निधी फाऊंडेशन गेल्या काही वर्षापासून हीच मानसिकता बदलण्यासाठी मकरसंक्रांतीला सॅनिटरी पॅडचे वाण देत आहे.
मकरसंक्रांतीला वाण म्हणून दिली जाणारी भेटवस्तू महिलांना दैनंदिन जीवनात कामाला येणारी वस्तूच असते. त्यामुळे सॅनिटरी पॅड देखील एक आवश्यक बाब आहे. निधी फाऊंडेशनने गेल्या वर्षी सार्वजनिक हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेऊन सॅनिटरी पॅड वाण देण्याचा एक लहानसा उपक्रम राबविला होता. मासिक पाळी विषयी जेवढे गैरसमज ग्रामीण भागात आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक संकुचित मानसिकता शहरात आहे. सर्वसामान्यांसह प्रत्येकाची मानसिकता बदलण्यासाठी निधी फाऊंडेशन कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करत असते. जेव्हा सॅनिटरी पॅडचे वाण मान्यवर महिला स्वीकारतील तेव्हा एक वेगळा संदेश समाजात रुजला जाईल याच उद्देशाने मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅडचे वाण देण्यासाठी व जनजागृती व्हावी या उद्देशाने महिलांना बोलवून आज कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमाला महापौर भरती सोनवणे, नगरसेविका सिंधूताई कोल्हे , नगरसेविका शुचिता हाडासह महिलांची मोठ्यासंख्येने उपस्तीथी होती.