हैदराबाद । कोरोना लसीकरणानंतर अनेकांना साईड इफेक्ट झाल्याच्या घटना समोर येत आहेत. तेलंगान्यात कोरोना लस घेतलेल्या अॅम्बुलन्स चालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, तर दुसरीकडे पंजाबमधील फिरोजपूर येथे एका आशा वर्करने कोरोनाची लस घेतल्यानंतर त्याची प्रकृतीत बिघाड झाला आहे. फिरोजपूर येथील आशा कार्यकत्री बिंदिया (वय 35) हिने कोरोना लस घेतल्यानंतर, त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर बिंदिया यांना फिरोजपूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोरोनाची लस घेतल्यानंतर बिंदिया घरी गेली. त्यांनंतर त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांनी तात्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
तर तिकडे तेलंगानाच्या निर्मल जिल्ह्यात एका अॅम्बुलन्स चालकाचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विठ्ठल असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याने 19 जानेवारी रोजी सकाळी 11.30 च्या दरम्यान कोरोनाची लस घेतली होती. त्याच रात्री त्यांना अंगदुखीचा त्रास सुरु झाला. व 20 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे.
विठ्ठल यांच्या कुटुंबियांनी कोरोना लसीमुळे विठ्ठल यांच मृत्यू झाल्याचं आरोप केला आहे. मात्र जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. कोरोना लसीमुळे मृत्यू न झाल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. दरम्यान तेलगांना आरोग्य विभागाचं म्हणणं आहे की, सध्या या प्रकरणाची तपासणी सुरु असून, संबंधीत चौकशीचे रिपोर्ट आरोग्य विभाग राज्य AEFI ला सोपवणार आहे.