Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावातील मेहरूण परिसरात दोन गटात हाणामारी

by Divya Jalgaon Team
October 23, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
jalgaon news

जळगाव प्रतिनिधी – शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत, त्याच पाश्र्वभूमीवर किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण करून गुप्ती आणि लोखंडी पट्टीने वार करण्यात आल्याची घटना मेहरूण परिसरातील दर्गाजवळ दोन गटात हाणामारी घडली. यात दोन जखमी झाले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गटात हाणामारी

जुबेर यासीम खाटीक (वय-३६) रा. पोलीस कॉलनी, सुप्रिम कॉलनी जळगाव हे रिक्षाचालक आहेत. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते मित्र अशरफ शहा रा. सुप्रिम कॉलनी हे दोघे जहारतसाठी दर्गावर गेले होते.जावेद शेख हा त्याच्या कुटुंबियासह दुचाकीने जहारत साठी आले होते. जावेदने दुचाकीचा रेस वाढवून जोरजोरात आवाज केला.

रागाने बाहेर जावून जावेद शेखने मित्र शोयब शेख सलीम, त्यानंतर संशयित आरोपी जावेद व त्यांचे मित्र घटनास्थळाहून पसार झाले. जुबेर खाटीक यांच्या फिर्यादीवरून जावेद शेख, शोयब शेख सलीम, अमर महबुब तडवी, समिन शेख जावेद शेख यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, मोहम्मद शोएब शेख सलीम (वय-२०, रा. बिलाल चौक तांबापूरा) हे २२ ऑक्टोबर रोजी मित्र अमल तडवी, मेहबुब तडवी, शब्बीर खान जावेद खान असे मेहरूणमधील दर्गावर जहारतसाठी गेले असता, जुबेर खाटीक हा शोएबच्या आत्याशी भांडण करत होता. दोघांचे भांडण सोडविण्यासाठी शोएब मित्रांसह गेल्याचे याचा राग जुबेरला आला.

जुबेरने हातातील लोखंडी पट्टी शोएबच्या हातावर मारून जखमी केले. तसेच जुबेरसह अहमद शाहा डबुशाह, जुबेरचा भाऊ, शाब्बीर खाटीक, गुलाब खाटीक अशांनी मारहाण केली. शोएबच्या फिर्यादीवरून जुबेरसह इतर तीन  जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीसात परस्परविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हा नोंदविल्यानंतर एमआयडीसी पोलीसांनी दोन्ही गटातील संशयित आरोपी जावेद शेख भिकन (वय-२६), मोहम्मद शोयब तडवी शेख सलीम (वय-२०), अमर मेहबुब तडवी (वय-१९) आणि समिर शेख जावेद शेख (वय-१९) सर्व रा. तांबापूरा या चौघांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. आज दुपारी चौघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

अजून वाचा 

बोरखेडा हत्याकांड : मुख्य संशयित आरोपी गजाआड

Share post
Tags: AreaCrime newsJalgaon newsMarathi NewsMehrun
Previous Post

कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाही- खडसे

Next Post

प्रदेश भाजपमध्ये निष्ठावंत व्यक्तींवर अन्याय

Next Post
bjp news

प्रदेश भाजपमध्ये निष्ठावंत व्यक्तींवर अन्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group