जळगाव (प्रतिनिधी) – बोरखेडा गावातील येथे चार भावंडांची निर्घुण हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी आज २२ रोजी मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
मुख्य संशयित आरोपी चे नाव महेंद्र सिताराम बारेला (वय १९, रा. केऱ्हाळा) असे नाव आहे. या संशयिताने बलात्कार व हत्या करण्यामध्ये त्याची भूमिका आहे, असे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणारी
रावेर तालुक्यातील बोरखेडा शिवारात दि. १६ ऑक्टोबर रोजी शेतातील शेतमजुराच्या घरात चार भावंडांचा निर्घुण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यासंदर्भात रावेर पोलीस स्थानकात ३०२ सह तपासादरम्यान ३७६ (अ) ४५२ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१०, १२ अन्वये कलमांची वाढ करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सबळ व शास्त्रोक्त पुरावे मिळाल्यानंतर पोलीस पथक काही निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे.
संशयित आरोपी महेंद्र बारेला याला शास्त्रीय पुराव्यांवर अटक केली असून तपास सुरू असल्याचे मुंढे म्हणाले. या गुन्ह्यात ७० जणांची विचारपूस करण्यात आली असून ५४ जणांचे जाबजबाब नोंदवण्यात आले आहे. तपासकामी नाशिक, धुळे, नंदुरबार सह जिल्हयातील ८० अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहे. ६० दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेस पोलीस अधिक्षक डाॅ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखाचे निरीक्षक बापू रोहोम, नाशिक गुन्हे शाखा के..के.पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.