जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रेल्वे रुळावरील 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तपास जळगाव पोलीस करीत आहे.
मयताचे नाव अविनाश शैलेंद्र सोनवणे (वय २४, रा. पिंप्राळा,हुडको) हा तरुण आज दुपारी घराबाहेर पडला होता. परंतू बजरंग बोगदा जवळील रेल्वे खंबा क्रमांक ४१८/३-१ अप लाईनवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याची ओळख दुपारी ४ वाजेच्या सुमारास पटली. अविनाश सोनवणे याचा मागील महिन्यात साखरपुडा झाला होता. त्याचा घातपात झाला असावा अशी शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. अविनाशच्या पश्चात तीन भाऊ, आई असा परिवार आहे. पुढील तपास जळगाव पोलीस करीत आहे. दरम्यान, अवघ्या दोन महिन्यावर लग्न असतांना अविनाशने केलेल्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.