जळगाव प्रतिनिधी । प्रशासनाने पाठविलेला अहवाल समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. आज जिल्ह्यातून फक्त ९८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. तर २२५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात जळगाव ग्रामीण, एरंडोल, पारोळा तालुक्यातील रूग्ण संख्या निरंक असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव शहर – ३८, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१३, अमळनेर-३, चोपडा-४, पाचोरा-३, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-३, एरंडोल-०, जामनेर-९, चाळीसगाव-११, मुक्ताईनगर- ४, बोदवड-३, अन्यजिल्हे १ असे एकुण ९८ रूग्ण बाधित आढळले आहे.
जिल्ह्यात एकुण कोरोना बाधित रूग्ण संख्या ५२ हजार ३८८ वर पोहचली असून त्यापैकी ४९ हजार ५७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज २ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण मृतांचा आकडा १२५० वर पोहचला आहे. जिल्ह्यातील विविध कोवीड रूग्णालयात १ हजार ५५९ रूग्ण उपचार घेत आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.