Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ख्वाजामियाँ दर्ग्याजवळची कबर पहाटे ५.३० ला हटवली

अतिक्रमण विभागाचे पथकाने केली कारवाई

by Divya Jalgaon Team
January 23, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
ख्वाजामियाँ दर्ग्याजवळची कबर पहाटे ५.३० ला हटवली

khajamiya dargah atikraman

जळगाव – शहरातील ख्वाजामियाँ चौकात गणेश कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर असलेले वादग्रस्त अतिक्रमण मुस्लिम समाजातील बऱ्याचशा लोकांना विश्वासात घेत महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. दोन्ही अतिक्रमण हटविल्याने ख्वाजामियाँ चौक ते गणेश कॉलनी रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पहाटेची केलेली कार्यवाही बद्दल नाराजी ही व्यक्त करण्यात आली.

गणेश कॉलनी मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा होऊन नागरिकांना रहदारीस अडथळा होणार नाही. त्यामुळेअतिक्रमण हटविण्यात आले. सकाळी ५.३० वाजताच महापौर भारती सोनवणे, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, उपायुक्त संतोष वाहुळे, नगरसेवक कैलास सोनवणे, अमित काळे, मनोज काळे पोलीस फौजफाट्यासह पोहचले.

विधीवत दुवा पठण करून काढले अतिक्रमण मात्र पहाटेची केलेली कार्यवाही बद्दल नाराजी –
सकाळी ६ वाजता मनपाच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी दुवा पठण केली त्यानंतर तेथील चादर आणि इतर साहित्य एका बाजूला ठेवण्यात आले. मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने ते अतिक्रमण हटविण्यात आले. ख्वाजामियाँ दर्ग्याच्या बाहेर असलेले जुने लोखंडी गेट देखील मनपाने महापौरांच्या उपस्थितीत हटविण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम समुदायाचे नागरिक गुरुवारी जास्त संख्यने दर्ग्यावर जातात. त्यामुळे आज पहाटे केलेली कार्यवाही ने मुस्लिम समुदायाचे मन दुखावल्या गेल्याची भावना ही अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

Share post
Tags: Jalgaon newsMarathi Newsअतिक्रमणउपायुक्त संतोष वाहुळेख्वाजामियाँ दर्ग्यामहापौर भारती सोनवणेसर्जिकल स्ट्राईक;ख्वाजामियाँ चौकातील अतिक्रमण हटविले
Previous Post

जिल्ह्यात आज ३७ रुग्ण कोरोनाबाधित; ४५ रूग्ण बरे झाले

Next Post

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २१ जानेवारी २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, गुरुवार, २१ जानेवारी २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group