मेष : किरकोळ जखमा होऊ शकतात. हितशत्रूंचा त्रास जाणवू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होतील. नवीन मित्र जोडाल. मानापमानाचे प्रसंग येवू शकतात.
वृषभ : गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. जोडीदाराशी वाद संभवतात. कौटुंबिक खर्च वाढू शकतो.
मिथुन : छुप्या शत्रूंवर विजय मिळवू शकाल. हातातील कामात यश येईल. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. भाजणे, कापणे यांसारखे त्रास जाणवू शकतात. नातेवाईकांना त्रास होण्याची शक्यता आहे.
कर्क : मुलांच्या स्वतंत्र वृत्तीत वाढ होईल. पोटाची काळजी घ्यावी. बौद्धिक ताण जाणवेल. सट्टा, जुगार यांपासून दूर राहावे. मुलांशी जुळवून घ्यावे.
सिंह : कौटुंबिक समस्येतून मार्ग काढावा. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. गृहसौख्याकडे लक्ष द्यावे. शेतीतील मालाची योग्य जपणूक करावी.
कन्या : न डगमगता कामे करावीत. हटवादीपणा करू नये. टीकेला सामोरे जावे लागेल. वैचारिक मतभेद राहतील. परिस्थितीशी जुळवून घ्यावे.
तूळ : धडपड करून कामे मिळवाल. खर्च करतांना विचार करावा. स्वभावात उतावीळपणा येईल. बोलतांना सारासार भान राखावे. वादात भाग घेणे टाळावे.
वृश्चिक : तुमची दगदग वाढेल. स्वभावात चिडचिडेपणा येईल. पित्तविकाराचा त्रास जाणवेल. क्षुल्लक गोष्टीवरून वाद वाढू शकतात. हातातील कामावर लक्ष द्यावे.
धनू : खर्च वाढू शकतात. जुन्या गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. कोर्ट-कचेरीची कामे रेंगाळतील. मानसिक स्वास्थ जपावे. आर्थिक प्रकरणात जपून राहावे.
मकर : कष्ट काहीसे वाढू शकतात. घेतलेल्या श्रमाचे चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. दिवस खटपट करण्यात जाईल.
कुंभ : कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. तुमच्या विरोधकांचा त्रास वाढू शकतो. आपली पत सांभाळावी. कामाच्या ठिकाणी नवीन बदल घडून येतील. व्यावसायिकांनी अडचणीतून मार्ग काढावा.
मीन : प्रवासात काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. वडीलधार्यांचा विरोध होऊ शकतो. स्वकष्टावर भर द्याल.