यावल (रविंद्र आढाळे) –येथील नगर परिषदच्या विषय समितीच्या सभापतींची आज निवड करण्यात आली असून , महीला नगराध्यक्षानंतर आता सर्व विषय समीत्यांच्या सभापतीपदावर देखील महीलांचीच निवड लागली आहे.
दरम्यान आज यावल नगर परिषदच्या सभागृहात जिल्हाधिकारी जळगाव यांच्या दिनांक ८ / o१ / २०२१ रोजीच्या सभा सुचनानुसार आज दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२ वाजता पिठासीन अधिकारी यावलचे तहसीलदार महेश पवार आणी मुख्याधिकारी बबन तडवी नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समितीच्या सभापती निवडी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते , या विशेष सभेत एकुण १५र्निवाचीत सदस्यानी भाग घेतल्याने कोरम पुर्ण होवुन नगर परिषदच्या याच वर्षा अखेर होणाऱ्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीपुर्वीची शेवटच्या टप्यातील विषय समितीच्या सभापती पदांची निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी सौ . कल्पना दिलीप वाणी , शिक्षण समितीच्या सभापतीपदी सौ . रेखा युवराज चौधरी , आरोग्य वैदक व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी श्रीमती शमशाद बेगम महम्मद खान, महीला व बालविकास समितीच्या सभापतीपदी श्रीमती सईदाबी शेख हारूण यांची निवड करण्यात आली असुन तसेच पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध सभापती नगर परिषदचे नगराध्यक्ष सौ . नौशाद मुबारक तडवी आणी उपनगराध्यक्ष सौ .रूख्माबाई नथ्थु भालेराव हे असतील , तर समिती सदस्य म्हणुन सौ . कल्पना दिलीप वाणी , सौ . रेखा युवराज चौधरी , श्रीमती शमशाद बेगम महम्मद खान व श्रीमती सईदाबी शेख हारूण हे असतील , आजच्या या विषय समिती सभापती निवडीच्या विशेष सभेस नगरसेवक व माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील , नगरसेवक प्रा मुकेश पोपटराव येवले , नगरसेवक अस्लम शेख नबी , नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ , सौ .पुर्णीमा राजेन्द्र फालक, श्रीमती शिला श्रीधर सोनवणे , मनोहर सोनवणे यांनी आपला सहभाग नोंदविला असुन, नवर्निवाचीत विषय समित्यांच्या सभापतींचे यावेळी पिठासिन अधिकारी व तहसीलदार महेश पवार व उपस्थित सर्व सन्मानिय नगराध्यक्ष सौ . नौशाद तडवी गटनेते अतुल पाटील , प्रा . मुकेश येवले यांच्यासह उपस्थित .नगरसेवकांच्या वतीने स्वागत करण्यात आले . यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या विविध प्रलंबीत समस्या आणी विकास कामांकडे अग्रक्रमांकाने लक्ष द्यावे अशी अपेक्षा नगरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे .


