अमळनेर प्रतिनिधी । महाविकास आघाडीतर्फे उद्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आमदार अनिल पाटील यांनी जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडीतर्फे मतदारसंघातील नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर मतदारसंघातील ८९ ग्रामपंचायत सर्वसदस्यांचा आमदार अनिल भाईदास पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवांकित करण्यात येणार आहे.
या समारंभातमतदारसंघातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केले आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत हा विकासाचा महत्वाचा कणा आहे. ग्रामपंचायतीत विजयी झालेल्या नवनियुक्त सदस्यांना गावाचे विकासकामे मिळण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी मतदारसंघातील सर्व सदस्यांनी भेदाभेद न करता या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आमदार अनिल पाटील व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.