Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आज शपथविधी; काय असणार पगार आणि सुविधा?

by Divya Jalgaon Team
January 20, 2021
in राष्ट्रीय
0
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आज शपथविधी; काय असणार पगार आणि सुविधा?

वॉशिंग्टन : जो बायडन आज अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला पूर्णपणे छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सुरक्षा आणि शपथविधी सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून वॉशिंग्टनमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 25 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. भारतीय वेळेनुसार, रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन आणि उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

शपथविधी सोहळ्या दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या शपथविधी सोहळ्याचा संपूर्ण आराखडा बदलण्यात आला आहे. जो बायडन यांच्या टीममधील अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या नागरिकांना राजधानीत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायजडन यांना पगार आणि इतर सर्व भत्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया राष्ट्रपती म्हणून बायडन यांचा पगारासंदर्भातील काही गोष्टी, तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत…

न्‍यूयॉर्कमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा वार्षिक पगार जवळपास चार लाख अमेरिकन डॉलर इतका असणार आहे. जर भारतीय चलनात याचं मुल्य सांगायच झालं तर, जवळपास 2 कोटी 92 लाख रुपये. याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून 50 हजार डॉलर्सचा वार्षिक भत्ताही मिळतो. तसेच एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवासी भत्ताही दिला जातो.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना मनोरंजनासाठी वार्षिक 19 हजार डॉलर्स देण्यात येतात. जर एखाद्या राष्ट्रपतींना आपला पगार दान करायची असेल तर तीदेखील करता येते. राष्ट्रपतींची पत्नी म्हणजेच, अमेरिकेची फर्स्ट लेडीला कोणताच पगार दिला जात नाही.

Share post
Tags: #Joe BidenInternational NewsMarathi NewsnewsWashingtoneराष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची आज शपथविधी; काय असणार पगार आणि सुविधा?
Previous Post

पी.एन. गाडगीळ ज्वेलर्सची तब्बल १ कोटी ६० लाखात फसवणूक

Next Post

महाविकास आघाडीतर्फे नवनिर्वाचित उद्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार

Next Post
महाविकास आघाडीतर्फे नवनिर्वाचित उद्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार

महाविकास आघाडीतर्फे नवनिर्वाचित उद्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group