पाळधी, ता. धरणगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील सावदा-रिंगणगाव रस्त्यावरील जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली आहे. तसेच विशेष पोलीस महानिरिक्षक यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत जळगावातील काही राजकीय मंडळींना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी संशयितांवर कारवाई केल्याचे काम सुरु होते.
सावदा-रिंगणगाव रस्त्यावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरिक्षकांना मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार पथकाची निर्मिती करण्यात आली. या पथकाने रात्री साडेआठच्या सुमारास येथे छापा मारला. या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली असून यात जळगावातील काही माजी नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकचे परिविक्षाधीन डीवायएसपी गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. यातील संशयितांवर रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.