जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर लढ्ढा फार्म हाऊस समोर सुसाट कंटेनरने दुचाकीला चालकांसह चिरडल्याची घटना घडली होती. शहरातून जाणार्या महामार्गावर लढ्ढा फार्मच्या पुढे दुचाकीस्वारांना उडवून पलायन केलेल्या कंटेनर चालकाला अखेर अटक करण्यात आली आहे.
लढ्ढा फार्म हाऊससमोर सुसाट कंटेनरने दुचाकीला चालकांसह चिरडल्याची घटना घडली होती. अपघातात समाधान श्रीराम चंदन(वय-३१रा.येवला.ता.नाशिक) याचा जागीच मृत्यु झाला होता, तर त्याच्या सेाबत अंबादास बच्छाव हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एमआयडीसी पेालिस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात अपघाताला कारणीभुत कंटेनर चालक घटना घडल्या पासुन फरार होता.
निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या सुचने वरुन उपनिरीक्षक रामकृष्ण पाटिल, सचिन पाटिल, गोविंदा पाटिल अशांच्या पथकाने कंटेनर चालक गुलशन श्रीचंद्रभान चंभार (वय-२६,रा.कटोवा पेास्ट,नथ्थपुरलधेाना जलालपुर उत्तर प्रदेश) याला नशिराबाद गावातील खालची अळी येथून ट्रान्सपोर्ट चालकाच्या घरुन अटक करण्यात आली आहे.