जळगाव – तालुक्यातील वावडदा बसस्थानकावर गावठी हात भट्टी .देशी दारू सट्टा ऊत आला आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यांना खतपाणी मिळतेय. याकडे मात्र अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
या परिसरातील वावडदा येथे गेल्या ३ वर्षांपासून सट्टा पूर्णपणे बंद होता. परंतु, आता हा अवैध धंदा मोठ्या जोमाने सुरू आहे. या गैरप्रकाराच्या आहरी गेलेल्या गरीबांचे मोठे नुकसान होतेय. आशेपोटी हातमजुरी करणारे लोक या सट्ट्य व दारू कडे दवळत आहेत. दररोज २०० रुपये रोजाने काम करणारे गोरगरीब व त्याच्या संसाराचे वाटोळे होत आहे. या प्रकारांमुळे गुन्हेगारी जास्त वाढतेय. या भागातील सट्टा दारू त्वरित बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कापडणे यांनी केली आहे