रावेर प्रतिनिधी । नाशिक मध्यवर्ती कारागृहातील उमेदवाराने चक्क जेलमध्ये बसून ग्रामपंचायत निवडणूक जिंकली. एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत नाशिक कारागृहात स्थानबध्द असणार्या स्वप्नील मनोहर पाटील या तरूणाने चक्क कारागृहातूनच निवडणूक लढवुन दणदणीत विजय संपादन केला आहे.
एमपिडीए कायद्या नुसार नाशिक मध्यवर्ती कारागृहात असणार्या स्वप्नील मनोहर पाटील या तरूणाने बक्षीपुर ग्राम पंचायत निवडणूकीत विजयी झाले आहे.विशेष म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्वप्नील मनोहर पाटील हा मागील पाच महिन्यां पासुन आहे. तर इकडे बक्षीपुर ग्राम पंचायत निवडणुक लागली होती. जेल मध्ये असून स्वप्नील पाटील बक्षीपुर ग्राम पंचायत निवडणूक लढवली यात तो २९१ मते घेऊन विजयी झाला आहे. विशेष बाब म्हणजे त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला फक्त ७७ मते मिळाली आहे. यामुळे स्वप्नीलचा दणदणीत विजय झाला आहे. कारागृहातून त्याने मिळविलेला विजय हा चर्चेचा विषय बनला आहे.