भुसावळ प्रतिनिधी । शहरातील भुसावळातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ जुन्या वादातून पुन्हा गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
भुसावळ शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ रात्री दहाच्या सुमारास गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही जण येथे बसले असतांना त्यांच्यात वाद झाला. यातूनच एकाने गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस स्थानकाचे निरिक्षक बाळासाहेब ठोंबे हे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना घटनास्थळी गोळी व काडतूस आढळून आले. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर, या प्रकरणातील संशयितांची ओळख पटविण्यात आली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.