यावल (रविंद्र आंढाळे) – तालुक्यातील किनगाव गावात सार्वजनिक ठिकाणी एका व्याक्तीने महीलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याबाबत यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
किनगाव तालुका यावल येथे दिनांक १४ जानेवारी रोजी रात्री २१.४५वाजेच्या सुमारास किनगाव गावातील रमेश विकास कोळी यांच्या घरासमोर सार्वजनिक ठीकाणी किनगाव येथील राहणार प्रदीप ईच्छाराम कोळी यांनी एका २३ वर्षीय फिर्यादी महीले सोबत असलेल्या तरुणीस रस्त्याने जातांना धक्का मारून तिचा हात धरून तिला पैसे दाखवुन अश्लील शिवीगाळ करून लज्जा वाटेल असे तरूणीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत केले व विनयभंग केले.
याबाबत त्या तरुणीच्या नातेवाईक महीलेने दिनांक दिनांक १५ जानेवारीस पोलीसात फिर्याद दिल्याने यावल पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असुन , गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनिल तायडे हे तपास करीत आहे . दरम्यान या घटनेमुळे एका गटाकडुन गुन्ह्यातील संशयीत आरोपी प्रदीप कोळी व तिची पत्नीस बेदम मारहाण झाल्याने ते दोघही जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल असुन , संशयीत आरोपीच्या पत्नीची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे . दुसऱ्या एका दंगलीच्या गुन्ह्यात तिन जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त असुन त्यांना न्यायलयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे कळते