जळगाव – जळगाव महागरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना भरत सपकाळे यांचा एकमेव अर्ज होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.
महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर महिला व बालकल्याण समिती सभापती पदाच्या निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते