यावल( प्रतिनिधी ) तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रकीया पार पडणार असुन याकरीता शासकीय यंत्रणा सज्ज झाली असुन शेकडो कर्मचारी व अधिकारी आज सकाळपासुन गावनिहाय आपआपल्या मतदान केन्द्रावर विविध वाहनांनी रवाना झाले आहे.
यावल तालुक्यात होवु घातलेल्या ४६ ग्रामपंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षीक निवडणुकीसाठी उद्या १७९ मतदान केन्द्रावर ३५९ ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीकरीता १७९ईव्हीएम यंत्रणेवर सुमारे ९५ हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असुन यासाठी एकुण ८९५ उमेदवारांनी आपल्या उमेदवाराचा अर्ज दाखल केले आहेत.
या संपुर्ण ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रीया निवडणुक निरिक्षक व्ही .व्ही . बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार , नायब तहसीलदार आर .डी . पाटील , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस. पाटील आणी २७ निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यासह सुमारे ९०० कर्मचारी यांच्या त्यात सहभाग असुन , संपुर्ण निवडणुकीची मतदान प्रक्रीया शांतेत व आचार संहीतेच्या अधीन राहुन व्हावी याकरिता कायदा सुव्यवस्थेसाठी विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे, पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , सहाय्यक पोलीस निरिक्षक नारखेडे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद रवांडबहाले यांच्यासह १०० पोलीस कर्मचारी , १२५गृहरक्षक दलाचे कर्मचारी ८ पन्नास सिट स्कुल बस,२६क्रुझर , २ इको, १ टाटा सुमो , २टवेरा , ३ बोलोरो आणी ६एसटी बस मिळुन ५१वाहनांचा निवडणुकीत सहभाग आहे .