शिरसोली (अशोक पाटील) – येथील युवकांना पोलीस भरती व व्यायाम करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रींगणात उभे असलेल्या उमेदवारानी काही निधी उपलब्ध करुन दीला आहे.
तसेच रनिंगच्या ट्रॅक (धावपट्टी) साठी सुर्य फुल कंपनीचे संचालक अरुणदादा पाटील यानी शेत उपलब्ध करुन दीले आहे. तर प्रशांत हाँटेलचे संचालक विजय बारी यानी पाण्याचा टँकर उपलब्ध करुन दीला आहे. तर ट्रॅकची दबाई करण्यासाठी अशोका बिल्डकाँम चे सिव्हील इंजिनिअर योगेश इंगळे. यानी कंपनीनचे रोलर उपलब्ध करुन दीला आहे. या सर्वांचे शिरसोली गांवातील युवकांकडुन जाहीर अभार मानन्यात येत आहे. तसेच भविष्यात शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा यासाठी वाचनालय( रीडींगची ) शेवा उपलब्ध करुन द्यावी असे कळकळीचे अवहान युवकान कडुन केले जात आहे.