मुंबई : सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय. तर चांदीचे भावही 300 रुपयांनी घसरले आहेत. मुंबईत 24 कॅरेट आजचा सोन्याचा भाव 49 हजार 450 रुपये प्रति तोळा आहे. तर, मुंबईत चांदीचा भाव 66 हजार रुपये प्रति किलोवर घसरला आहे. तर, मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव 48 हजार 450 रुपये प्रति तोळा इतका आहे.
आज सकाळी एमसीएक्सवर सोन्याची डिलिव्हरी दिसते. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये झाला. यावेळी फेब्रुवारी डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव दहा ग्रॅमसाठी 395 रुपयांनी घसरुन 48,910 रुपये झाला. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये सोन्याचा भाव 196 रुपयांच्या वाढीसह प्रतितोळा 49,230 रुपयांवर होता. यावेळी चांदीच्या डिलीव्हरीत घट झाली आहे. मार्च डिलीव्हरीसाठी चांदीचा भाव 721 रुपयांनी घसरुन 65,300 रुपये प्रतिकिलो पातळीवर होता.
तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव काय?
मुंबई –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
पुणे –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,०00 रुपये प्रति किलो
जळगाव –
सोने – 51,021 प्रति तोळा
चांदी – 66,923 प्रति किलो
नागपूर –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
नाशिक –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
कोल्हापूर –
सोने – 50,900 रुपये प्रति तोळा
चांदी – 65,300 रुपये प्रति किलो
सरकार विकतंय स्वस्त सोनं
सॉवरेन गोल्ड बॉन्ड ची दहावी मालिकेंतर्गत 11 जानेवारी ते 15 जानेवारीदरम्यान यात गुंतवणूक करु शकता. यासाठी सेटलमेंटची शेवटची तारीख 19 जानेवारी आहे. दहाव्या मालिकेत रिझर्व्ह बँकेनं एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,104 रुपये ठेवली आहे. जर कोणत्याही गुंतवणूकदारानं यासाठी ऑनलाईन अप्लाय केल्यास डिजिटल मोडमध्ये पेमेंट केले जाते. त्यांना 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळते. यासाठी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,054 रुपये असेल.