Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा शस्त्रसाठा जप्त

by Divya Jalgaon Team
January 14, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा शस्त्रसाठा जप्त

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात मोठा शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

प्रविण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा़ वाळद, ता. खेड), निलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा. वांझरवाडी, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत. काल सायंकाळी प्रचार संपला असून उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणुका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पेट्रोलिंग सुरु केले होते.

गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्टँडवर पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बसस्टँडवर पोहचले. त्यांनी तेथे संशयास्पद वावरणाºया दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांची अंगझडती घेतली असता दोघांचा कमरेला प्रत्येकी २ असे देशी बनावटीचे ४ पिस्तुल व त्यामध्ये प्रत्येकी २ काडतुसे असे एकूण ८ काडतुसे आढळून आली. दोघांनाही अटक करुन खेड पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा शस्त्रसाठा जप्तही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट, सहायक निरीक्षक अमोल गोरे, हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, दत्तात्रय जगताप, शब्बीर पठाण, विद्याधर निच्चीत मुकुंद आयचित, प्रमोद नवले, सागर चंद्रशेखर, प्रसन्न घाडगे यांच्या पथकाने केली आहे.

दरम्यान, लोणी काळभोर येथे निवडणूक पार्श्वभूमीवर दोन गटांत भांडण झाले असून यामध्ये लोखंडी गज, लाकडी दांडक्याने यांचा वापर करण्यात आला आहे. दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून एकून साडेअकरा तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीत महाराष्ट्र केसरी पैलवान व शिवसेना तालुका प्रमुखासह २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share post
Tags: crimeMarathi NewsPuneपुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा शस्त्रसाठा जप्त
Previous Post

तरुणाईने वैचारिक अधिष्ठान ठेवावे : जयंत कुलकर्णी

Next Post

सोने – चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Next Post
सोने -चांदीचा दर

सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group