जळगाव : आजच्या तरुणाईला वैचारिक अधिष्ठानाची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे आचार आणि विचार हे तरुण पिढीला तारू शकतील, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद मंडळ, शिरपूरचे अध्यक्ष जयंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील नूतन मराठा महाविद्यालयात ‘युवकांची स्वतः ची बलस्थाने’ या विषयावर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जयंत बलवंत कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य एल पी देशमुख होते.
यावेळी जयंत कुलकर्णी म्हणाले कि, आजच्या भरकटलेल्या तरुणाईने स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी. विवेकवाद जोपासून जीवनशैली आदर्श ठेवावी. सकारात्मक ऊर्जेद्वारे कार्य करावे. नेहमी आशावादी राहावे. चांगले विचार वाचून आदर्श वर्तन ठेवावे, असेही कुलकर्णी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता देसले यांनी तर आभार निलेश चौधरी यांनी केले.