जळगाव – संयुक्त किसान मोर्चा जळगाव तर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनाचा कार्यक्रम घोषित केला होता त्यानुसार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा चे प्राध्यापक प्रीती लाल पवार, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र सोनवणे ,नियाज अली फाऊंडेशनचे अयाझ अली, वीर सावरकर रिक्षा युनियन चे दिलीप सपकाळे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे रमेश सोनवणे ,महाराष्ट्र जन क्रांतीचे महानगराध्यक्ष श्रीकांत मोरे, कम्युनिस्ट पक्षाचे अकील पठाण, पत्रकार संजय तांबे, कृष्णा जगदाळे भारत सोनवणे, दिलीप सपकाळे, विकास मोरे, आकाश चौधरी, जितेंद्र काळे ,रेहान सय्यद, किरण ठाकूर व शकील शाह आदींनी सुमारे एक तास निदर्शने करून विविध घोषणा बाजी केली.
जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
माननीय पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदन उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सूर्यवंशी साहेब यांना फारुक शेख यांच्या हस्ते देण्यात आले या निवेदनात मागण्या करण्यात आल्या होत्या की तीनही कृषी कायदे जे सरकारने केले आहे ते त्वरित रद्द करण्यात यावे, एम एस पी बाबत स्वामीनाथन समिती च्या शिफारशी लागू कराव्यात, जे वीज बिल आकारण्यात आलेले आहे ते मागे घेण्यात यावे ,कामगार विरोधी कायदे त्वरित रद्द करा व आदिवासी आणि पर्यावरण विरोधी पर्यावरणीय मसुदा 2020 हा सुद्धा रद्द करा अशा पाच मागण्यांचे निवेदन देण्यात आले.